एखाद्याचा खडतर प्रवास अनेकांसाठी प्रेरणादाई ठरतो. असाच ऑफिस बॉय म्हणून काम करतानाच आपली कवितेची आवड जपत गीतकार होण्याचा निलेश उजाळचा प्रवास नक्कीच प्रेराणादाई आहे. स्टार प्रवाहच्या नकळत सारे घडले या मालिकेचं टायटल सॉंग निलेशच्याच लेखणीतून उतरले आहे. संगीतकार निलेश मोहरीरणे आपलं एक तरी गाण संगीतबद्ध करावं हे त्याच स्वप्न हि या टायटल सॉंगच्या रूपाने स्टार प्रवाह ने सत्यात उतरवले आहे. निलेश एके काळी ऑफिस बॉय म्हणून काम करत होता. मी ज्या ऑफिस मध्ये काम करायचो तिथले माझे सर माझ्या कवितेच्या आवडीला प्रोत्साहन द्यायचे. कवी संमेलनासाठी सुट्टी द्यायचे. स्टार प्रवाहच्या प्रोग्रामिंग हेड श्रावणी देवधर ह्यांनी माझ्या कविता तेथेच वाचल्या. त्यांनी मला बोलावून घेतलं आणि एका कथेवर टायटल सॉंग लिहायला सांगितले आणि अश्या प्रकारे माझ्या गीतकाराच्या प्रवासाला सुरवात झाली.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews